भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या किट स्पॉन्सरसाठी बीसीसीआयने एडिडाससोबत 2028 पर्यंत करार केला आहे. बीसीसीआयने एमपीएसोबत करार संपल्यानंतर किलर कंपनीसोबत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी करार केला होता.
टीम इंडियाच्या नव्या जर्सीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज असे टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू दिसले आहेत.
महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधनाही नव्या जर्सीत दिसल्या.
आतापासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या जर्सीवर निळ्या रंगात इंडिया लिहिलेलं असेल. तसेच, खांद्यावर Adidas कंपनीच्या लोगोचे प्रतिनिधित्व करणारी पट्टी असणार आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाची जर्सी विद आउट कॉलर असेल. ही जर्सी खास गडद निळ्या रंगात डिझाइन केलेली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ फिकट निळ्या रंगाची जर्सी घालणार आहे. या जर्सीच्या खांद्याच्या भागावर Adidas कंपनीच्या लोगोचे प्रतिनिधित्व करणारे पांढरे पट्टे असणार आहेत.
यापूर्वी एमपीएल कंपनी भारतीय संघाची किट प्रायोजक होती. परंतु अलीकडे एमपीएलचे प्रायोजकत्व संपुष्टात आले आणि कंपनीने किलरचे तात्पुरते प्रायोजकत्व घेतले.
एडिडास कंपनीने 1 जूनपासून टीम इंडियाचे किट प्रायोजक म्हणून एक नवीन पाऊल उचलले आहे.
तीन प्रकारच्या क्रिकेटसाठी वेगवेगळ्या जर्सी तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय वनडे संघाची जर्सी बदलणार आहे.
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तयारी करत आहे. ओव्हल मैदानावर बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात विजेत्या संघाला चॅम्पियनचा मुकुट देण्यात येईल. त्यामुळे टीम इंडियाला 2013 नंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची चांगली संधी आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नव्या जर्सीत दिसला.