IND vs BAN : यशस्वी जयस्वालच्या रडारवर मॅक्युलमचा 10 वर्षे जुना रेकॉर्ड, इतकं केलं की झालं

| Updated on: Sep 16, 2024 | 7:18 PM

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेत काही विक्रम रचले जातील आणि काही विक्रम मोडले जातील यात शंका नाही. असाच एक विक्रम यशस्वी जयस्वालच्या रडारवर आला आहे.

1 / 5
भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेबाबत गेल्या काही दिवसात प्रचंड उत्सुकता वाढली आहे. बांगलादेशने पाकिस्तानला कसोटीत व्हाईटवॉश दिल्यानंतर या कसोटी मालिकेकडे पाहण्यााच दृष्टीकोन बदलला आहे. तसेच ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

2 / 5
2024 या वर्षाच्या सुरुवातील भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका भारताने 4-1 ने जिंकली होती. या मालिकेत यशस्वी जयस्वालने जबरदस्त फलंदाजी केली होती. आता बांगलादेशविरुद् पहिला सामना खेळण्यासाठी यशस्वी जयस्वाल सज्ज आहे. या मालिकेत एक विक्रम यशस्वी जयस्वालच्या रडारवर आहे.

3 / 5
यशस्वी जयस्वाल न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रँडन मॅक्युलम याचा 10 वर्षे जुना कसोटी विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. मॅक्युलमने एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. 2014 या वर्षी मॅक्युलमने कसोटीत 33 षटकार मारले होते.

4 / 5
जयस्वाल बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यातील चार डावात 8 षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर हा विक्रम त्याच्या नावावर होईल. यशस्वी जयस्वालने 2024 या वर्षात आतापर्यंत एकूण 26 षटकार मारले आहेत.

5 / 5
यशस्वी जयस्वाल सध्या एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या बेन स्टोक्ससोबत बरोबरी साधली आहे. बेन स्टोक्सने 2022 मध्ये 26 षटकार मारले होते. तर तिसऱ्या स्थानावर एडम गिलख्रिस्ट असून त्याने 2005 मध्ये 22 षटकार, तर वीरेंद्र सेहवागने 2008 मध्ये 22 षटकार मारले होते.