NZ v PAK : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, आता आलं वेगळंच टेन्शन
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडचा उतरता आलेख सुरु झाला आहे. सुरुवातीला दमदार सुरुवात केली. मात्र सलग तीन पराभवामुळे उपांत्य फेरीची वाटही बिकट झाली आहे. असं असताना न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला आहे.
1 / 6
न्यूझीलंडला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आणखी एक धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन दुखापतग्रस्त असताना आणखी एक धक्का बसला आहे. मॅट हेन्री दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
2 / 6
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ट्वीट करून मॅट हेन्री याच्याऐवजी संघात काइल जेमिसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. विश्वचषक तांत्रिक समितीने या बदलास मान्यता दिली आहे.
3 / 6
1 नोव्हेंबर रोजी दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हेन्रीला दुखापत झाली होती.आता आयसीसीकडून परवानगी मिळाल्यानंतर जेमिसन गुरुवारी रात्री बंगळुरुला पोहोचला आहे.
4 / 6
न्यूझीलंड संघाला यापूर्वीच दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. तीन खेळाडू यापूर्वीच जखमी झाले आहेत. केन विल्यमसन, लॉकी फर्ग्युसन, मार्क चॅपमन यांचा यात समावेश आहे.
5 / 6
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 13 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता. त्याचा अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे मागचे चार सामने खेळू शकला नाही.
6 / 6
गुणतालिकेत न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड संघाने पहिल्या चार सामन्यांमध्ये सलग विजय मिळवला होता. मात्र मागच्या तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. गुणतालिकेत 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय महत्त्वाचा आहे.