ODI World Cup 2023 : एबी डिव्हिलियर्सनं उपांत्य फेरीतील संघांची नाव जाहीर करून टाकली, पाहा कोणते संघ आहे ते

| Updated on: Aug 18, 2023 | 8:52 PM

ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होईल. पहिल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.

1 / 7
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या वनडे वर्ल्डकपासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दहा संघ जेतेपदासाठी प्रयत्नशील आहेत. भारतात विश्वचषक होत असल्याने जेतेपदासाठी टीम इंडियाची फेव्हरिट आहे. पण कोणते चार संघ बाद फेरीत जातील याबाबत भाकीतं वर्तवली जात आहेत.

2 / 7
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने यावेळी उपांत्य फेरीत प्रवेश करणार्‍या चार संघांची नावे जाहीर केली आहेत.

3 / 7
एबी डिव्हिलियर्सने एकमेव आशिया संघाची उपांत्य फेरीसाठी निवड केली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेला पसंती दिली आहे.

4 / 7
स्पर्धा घरच्या मैदानावर होत असल्याने टीम इंडियाला हरवणे सोपं नाही. त्यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार हे निश्चित असल्याचे एबीडीने सांगितले आहे.

5 / 7
एकदिवसीय विश्वचषकासाठी जोरदार तयारी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत धडक मारेल. एबीडीने सांगितले की, ऑस्ट्रेलिया एक संतुलित संघ असून उपांत्य फेरीत खेळेल.

6 / 7
गतविजेता इंग्लंड संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड संघात काही खेळाडू याआधी विश्वचषकासारखी महत्त्वाची स्पर्धा खेळले आहेत.इंग्लंड संघ उपांत्य फेरीतही प्रवेश करेल, असे एबीडीने सांगितले.

7 / 7
दक्षिण आफ्रिकेच्या संघात चांगले खेळाडू आहेत. त्यापैकी अनेकांना भारतात खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका संघ पोहोचेल, असं डिव्हिलियर्सने सांगितले.