वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. पात्र ठरलेले दहा संघ जेतेपदासाठी कसून सराव करत आहेत. वीरेंद्र सेहवाग याने उपांत्य फेरीत कोणते चार संघ पोहोचतील याची नावं जाहीर केली आहेत. चला पाहूयात यात कोणते संघ आहेत ते..
सर्वात पहिली पसंती ऑस्ट्रेलियन संघाला दिली आहे. ऑस्ट्रेलियन संघ कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरी गाठणार हे निश्चित आहे.
इंग्लंडचा संघही आशियात चांगली कामगिरी करतो. इंग्लंड हा संघ भारतात खेळणाऱ्या सर्वोत्तम संघापैकी एक आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानला डार्क हॉर्स म्हणून गणलं जातं. हा संघ स्पर्धेत मोठा उलटफेर करू शकतो आणि उपांत्य फेरी गाठू शकतो.
वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतातच असल्याने टीम इंडियाला फायदा होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया उपांत्य फेरी गाठेल असं सेहवागने सांगितलं आहे.
वनडे विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील, असे सेहवागने सांगितले.ही भविष्यवाणी खरी ठरते का? हे जाणून घेण्यासाठी साखळी टप्प्यातील सामने संपेपर्यंत वाट पाहावी लागेल.
वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. टीम इंडिया आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तसेच अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.