ODI World Cup 2023 : वर्ल्डकपमधील रेकॉर्ड या पर्वात मोडणं कठीण, जाणून घ्या का ते

| Updated on: Sep 26, 2023 | 7:07 PM

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबरला अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये काही विक्रम नोंदवले जातील. पण काही विक्रम मोडणं कठीण आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

1 / 9
वनडे क्रिकेट वर्ल्डकप इतिहासात ग्लेन मॅक्ग्राने सर्वाधिक गडी बाद केले  आहेत. 39 सामन्यात 71 गडी बाद केले आहेत. हा विक्रम मोडण्याच्या आसपासही कोणी नाही. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कला ही संधी आहे. पण त्याला या स्पर्धेत 23 गडी बाद करावे लागतील.

2 / 9
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 1992 ते 2011 या कालावधीत एकूण 6 वर्ल्डकप खेळले. यात 45 वनडे समन्यात त्याने 2278 धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडणंही कठीण आहे.

3 / 9
कुमार संगकारा याने 2015 वनडे वर्ल्डकपमध्ये सलग चार शतकं ठोकली होती. बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड विरुद्ध शतकी खेळी केली. आतापर्यंत अशी कामगिरी कोणी केलेली नाही. रोहित शर्माने 2019 मध्ये सलग तीन शतक ठोकली आहेत.

4 / 9
रोहित शर्मा याच्या नावावर एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. त्याने एकूण 5 शतकं ठोकली आहेत. तर 9 सामन्यात एकूण 648 धावा केल्या आहेत.

5 / 9
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील एका पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. 2003 वर्ल्डकपमधील 11 सामन्यात 673 धावा केल्या.

6 / 9
2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेच्या हर्शल गिब्सने एकाच षटकात 6 षटकार ठोकले होते. नेदरलँडच्या डान वॅन बंज याच्याविरोधात ही कामगिरी केली होती.

7 / 9
लसिथ मलिंगा याने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकाच षटकात सलग चार गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. 2007 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही कामगिरी केली. शॉन पोलाक, आंद्रे हॉल, जॅक कॅलिस आणि मखाया एनटिनी यांना बाद केलं.

8 / 9
वर्ल्डकप स्पर्धेत दुहेरी शतक ठोकण्याचा विक्रम मार्टिन गुप्टिल याच्या नावावर आहे. ख्रिस गेलने 2015 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध 215 धावांची खेळी केली होती. त्यानंतर मार्टिन गुप्टिल याने वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद 237 धावांची खेळी केली आणि विक्रम आपल्या नावावर केला.

9 / 9
वनडे वर्ल्डकप स्पर्धा सलग तीन वेळा जिंकण्याचा मान ऑस्ट्रेलियाला आहे. 1999, 2003 आणि 2007 चा वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. तर एकूण 94 वर्ल्डकप सामन्यात 69 सामन्यात विजय आणि 23 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.