ODI WC 2023: वनडे वर्ल्डकपपूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, आता काय झालं ते वाचा

| Updated on: Jun 20, 2023 | 6:51 PM

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. स्पर्धेसाठी अवघ्या दिवसांचा अवधी शिल्लक आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाला जेतेपद जिंकण्याची एक संधी आहे. पण स्पर्धेपूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

1 / 11
टीम इंडियाने गेल्या दहा वर्षात आयसीसी स्पर्धेचं एकही जेतेपद जिंकलेलं नाही. टी 20 वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची संधी गमावली. आता वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून टीम इंडियाला आशा आहेत. पण या स्पर्धेसाठी 4 सदस्यीय संघ टीम इंडियाची निवड करणार आहे. यावरूनच नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

2 / 11
स्टिंग ऑपरेशनमुळे निवड समितीने प्रमुख चेतन शर्मा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर या पदावर कोणाचीही निवड करण्यात आली नाही. हे पद अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे चार सदस्य टीम इंडियाची निवड करणार आहेत.

3 / 11
शिवसुंदर दास, सुब्रोत बॅनर्जी, सलिल अंकोला आणि श्रीधरन सरथ हे निवड समितीने सदस्य आहे. हे चार सदस्य विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड करणार आहेत.

4 / 11
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चौघांपैकी एकाने टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. तर उर्वरित तिघांनी एकूण 30 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

5 / 11
शिवसुंदर दास याने टीम इंडियासाठी 23 कसोटी आणि 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

6 / 11
सुब्रतो बॅनर्जी याने टीम इंडियासाठी 6 वनडे आणि एकच कसोटी सामना खेळला आहे.

7 / 11
सलिल अंकोला याने टीम इंडियासाठी एक कसोटी आणि 20 वनडे सामने खेळला आहे.

8 / 11
श्रीधरन सरथ याने टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 139 सामने खेळले आहेत.

9 / 11
चार सदस्यीय समिती वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड करणार असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच निवड समितीने 2022 च्या टी 20 वर्ल्डकपसाठई भारतीय संघाची निवड केली होती. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील संघावर शिक्कामोर्तब केलं होतं.

10 / 11
टीम इंडियासाठी आयसीसी स्पर्धा आणि किमान 25 वनडे सामने न खेळलेले निवड समितीवर असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी आपला राग व्यक्त करत आहेत.

11 / 11
टी 20 विश्वचषकासाटी निवडलेल्या संघावर जोरदार टीका झाली होती. काही खेळाडूंना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून वगळल्याने आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे वनडे वर्ल्डकपसाठी या समितीने निवडलेल्या संघाकडून अपेक्षा न ठेवलेल्याच बऱ्या असं नेटकरी सांगत आहेत.