PAK vs BAN : केएल राहुलनंतर अशी कामगिरी करणारा मोहम्मद रिझवान दुसरा विकेटकीपर, काय केलं वाचा

| Updated on: Aug 22, 2024 | 8:20 PM

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानची नाजूक स्थिती असताना रिझवानने महत्त्वपूर्ण खेळी केली. मोहम्मद रिझवानने आपल्या कसोटी कारकिर्दितील तिसरं शतक झळकावलं आहे. त्याने 143 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतकी खेळी केली.

1 / 6
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून दोन दिवसांचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवस पाकिस्तानच्या सउद शकील आणि विकेटकीपर बॅट्समन मोहम्मद रिझवानने गाजवला. रिझवानने आपल्या कसोटी कारकिर्दितील तिसरं शतक झळकावलं.

2 / 6
मोहम्मद रिझवानने बांगलादेशविरुद्ध पहिलं शतक झळकावलं आहे. मोहम्मद रिझवानने आतापर्यंत झळकावलेली तिन्ही शतकं पाकिस्तानातच ठोकली आहेत. दोन शतकं रावळपिंडीत, तर एक शतक कराचीत झळकावलं आहेत.

3 / 6
रिझवानने दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आता बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली आहे. मोहम्मद रिझवानने 143 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह तिसरं शतक झळकावले आहे.

4 / 6
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा मोहम्मद रिझवान 24 धावांवर होता. दुसऱ्या दिवशी मोहम्मद रिझवानची बॅट पुन्हा तळपली. त्याने आपलं शतक पूर्ण केलं. रिझवानने 890 दिवसानंतर शतक ठोकलं. यापूर्वी 12 मार्च 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकलं होतं.

5 / 6
मोहम्मद रिझवानने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी करत एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये शतक झळकावणारा दुसरा विकेटकीपर आहे. केएल राहुलने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले आहे.

6 / 6
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रिझवानसह सउद शकीलने शतकी खेळी केली. दोघा फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 200हून अधिक धावा केल्या आहेत.