Asia Cup 2023 | आशिया कपमध्ये टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने!
Asia Cup 2023 Team India vs Pakistan | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्डेज सामना हा पावसामुळे रद्द करावा लागल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.
1 / 6
आशिया कपमधील पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2 सप्टेंबरला सामना खेळवणयात आला. हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला.
2 / 6
मात्र आता क्रिकेट चाहत्यांसाठी गूड न्यूज आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान पुन्हा 10 सप्टेंबरला आमनेसामने येऊ शकतात.
3 / 6
सामना रद्द झाल्याने पाकिस्तानने सुपर 4 मध्ये धडक मारली. तसेच टीम इंडियाला सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी नेपाळ विरुद्ध जिंकावं लागणार आहे.
4 / 6
नेपाळ विरुद्ध जिंकताच टीम इंडिया सुपर 4 साठी क्वालिफाय करेल. टीम इंडिया-पाकिस्तान ए ग्रुपमध्ये आहेत. ए ग्रुपमधून क्वालिफाय केल्यानंतर दोन्ही संघ ए -2 आणि ए 1 स्थानी पोहचतील.
5 / 6
टीम इंडिया ग्रुप ए मधून अव्वल स्थानी राहिली तरी ए 2 असेल, कारण पाकिस्तानने ए ग्रुपमधून सर्वात आधी सुपर 4 मध्ये क्वालिफाय केलंय. सुपर 4 मध्ये 10 सप्टेंबरला ए 1 विरुद्ध ए 2 सामना होणार आहे. पाकिस्तान टीम ए-1 आहे. तर नेपाळ विरुद्ध टीम इंडिया जिंकल्यास ए 2 ठरेल. त्यामुळे 10 सप्टेंबरला भारत-पाक सामना होण्याची शक्यता आहे.
6 / 6
इतकंच नाही, टीम इंडिया-पाकिस्तान आशिया कप फायनलमध्येही आमनेसामने येऊ शकतात. मात्र आता फायनलबद्दल काही सांगता येत नाही, पण सुपर 4 मध्ये टीम इंडिया-पाकिस्तान निश्चित समजलं जात आहे.