PAK vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अर्धशतक झळकावत बाबरने मोडला रोहितचा विक्रम, काय ते वाचा
शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वात पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. न्यूझीलंडने पाकिस्तानला 46 धावांनी पराभूत केलं. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी घेतली. असं असलं तरी बाबर आझमने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली आणि रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला.
1 / 6
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने 20 षटकात 8 गडी गमवून 226 धावांचं आव्हान दिलं. पण पाकिस्तानचा संघ 18 षटकात सर्व गडीबाद 180 धावा करू शकला. पाकिस्तानचा पहिल्या सामन्यात 46 धावांनी पराभव झाला.
2 / 6
न्यूझीलंडने दिलेल्या विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला. सईम अयुब आणि मोहम्मद रिझवानने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर बाबर आझमने संघाचा डाव सावरला. 35 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या.
3 / 6
बाबर आझमने 33 चेंडूत अर्धशतक झळकावलं. तसेच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचा विक्रम मोडीत काढला आहे. टी20 क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम मोडला आहे.
4 / 6
बाबर आझमने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. तर रोहित शर्माने 33 वेळा अशी कामगिरी केली आहे. बाबर आझमने 99 व्या टी20 सामन्यात 34 वं अर्धशतक ठोकलं.
5 / 6
टी20 मध्ये सर्वाधिक 50हून अधिक अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 38 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
6 / 6
बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतकी खेळी करताच टी20 मध्ये वेगाने 3500 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनंतर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज आहे. विराट कोहलीने ही कामगिरी 96 डावात केली होती.