बांगलादेशकडून कसोटीत पराभूत होताच पाकिस्तानची भारताच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी, काय ते जाणून घ्या

| Updated on: Aug 26, 2024 | 5:57 PM

बांगलादेशने पाकिस्तानला कसोटीत पराभूत करत इतिहास रचला आहे. पाकिस्तानला त्यांच्याच धरतीवर धोबीपछाड दिल्याने क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पराभवासह पाकिस्तानने भारताच्या नको त्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

1 / 5
पाकिस्तानचा कसोटी इतिहासात पहिल्यांदाच बांगलादेशविरुद्ध पराभव झाला आहे. दुसऱ्या डावात पाकिस्तानने फक्त 30 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने सहज गाठलं आणि इतिहास रचला. यासह पाकिस्तानच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

2 / 5
पाकिस्तानने 448 वर 6 विकेट असताना डाव घोषित केला. पहिल्या डावात या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने 117 धावांची आघाडी घेतली. तसेच पाकिस्तानला 146 धावांवर रोखत फक्त 30 धावा विजयासाठी मिळाल्या. 14 कसोटी सामन्यातील बांगलादेशचा हा पहिलाच विजय आहे. 14 पैकी 12 सामन्यात पाकिस्तानने विजय, तर एक सामना ड्रॉ झाला होता.

3 / 5
पाकिस्तानच्या कसोटी इतिहासातील डाव घोषित केल्यानंतरचा हा 17वा पराभव आहे. डाव घोषित पराभूत होणारा पाकिस्तान कसोटी इतिहासातील पहिला संघ होता. 1961 मध्ये लाहोरमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना 387 धावांवर डाव घोषित केला होता. तर शेवटचं 2016 मध्ये मेलबर्नमध्ये 443 वर 9 विकेट असताना डाव घोषित केला आणि पराभव झाला.

4 / 5
भारताच्या कसोटी इतिहासात एक नकोसा विक्रम आहे. 1976 मध्ये भारताने असा पद्धतीने पराभव सहन केला होता. 1976 साली किंगस्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना 306 धावांवर 6 विकेट असताना डाव घोषित केला होता. मात्र हा सामना वेस्ट इंडिजने 10 विकेट्स राखून जिंकला होता.  तेव्हा बिशनसिंग बेदी हे कर्णधार होते.

5 / 5
कसोटी इतिहासात अशा पद्धतीने पराभूत होणारा भारत हा एकमेव संघ होता. आता पाकिस्तानने पहिला डाव घोषित केल्यानंतर 10 विकेट्सने पराभूत झाला आहे. त्यामुळे भारतासोबत नकोसा विक्रम शेअर केला आहे.