पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कायम आक्रमक असतो. मात्र हा आक्रमक आफ्रिदी भावूक झालेला दिसून आला ते त्याच्या मुलीच्या लग्नात.
शाहिद आफ्रिदी याने लेक अक्सा हीच्यासाठी भावूक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली. ही इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.
आफ्रिदीच्या लेकीचं लग्न कराचीत पार पडलं. यावेळेस लेकीला लग्नानंतर निरोप देताना आफ्रिदी भावूक झाला. आफ्रिदीच्या लेकीचा विवाह गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नसीर नासिर याच्याशी झाला. मात्र तेव्हा आफ्रिदीने लेकीला निरोप दिला नव्हता.
आता लग्नाच्या काही महिन्यांनी आफ्रदीने लेकीला निरोप दिला. आफ्रिदीने आपल्या लेकीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. आफ्रिदीने इंस्टा पोस्टमध्ये मुलीबाबत भरभरून लिहिलं.
दरम्यान आफ्रिदीने आपल्या धाकट्या लेकीचं लग्न पाकिस्तान क्रिकेट टीमचा गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी याच्यासोबत लावून दिलं होतं.