आयपीएल 2024 स्पर्धेत पाकिस्तानचा हा स्टार खेळाडू खेळणार? कसं काय ते वाचा

| Updated on: Jul 04, 2023 | 4:14 PM

आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना नो एन्ट्री आहे. अफगाणिस्तानसह इतर सर्व देशांच्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची परवानगी आहे. अशात आयपीएलमध्ये पाकिस्तानचा एक खेळाडू खेळण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याने स्वत:च इच्छा व्यक्त केली आहे.

1 / 7
आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत खेळाडूंवर पैशांचा वर्षावर होतो. लिलावात खेळाडूंची निवड होताना चांगलाच कस लागतो. पण एकदा का निवड झाली की चांदीच चांदी होते, हे ही तितकंच खरं आहे.

2 / 7
पाकिस्तानच्या दहशतवाद्या कारवाया पाहता भारताने त्यांच्याशी सर्वच संबंध तोडून टाकले आहेत. इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आयसीसी स्पर्धाव्यतिरिक्त दोन्ही संघ एकमेकांसमोर येत नाही. आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडूंना रेड सिग्नल आहे.

3 / 7
आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला संधी नाही. अशा स्थिती पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद अमीर याने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी त्याने तसं कारणही दिलं आहे.

4 / 7
मोहम्मद अमीर याने 2016 साली ब्रिटीश नागरिक आणि वकील नरजिस खान हिच्याशी लग्न केलं आहे. सध्या मोहम्मद अमीर इंग्लंडमध्ये राहात आहे. 2020 पासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अमीरला पुढच्या वर्षी इंग्लंडचं नागरिकत्व मिळणार आहे.

5 / 7
ब्रिटीश नागरिक झाल्यानंत त्याला आयपीएलची दारं उघडी होतील असं त्याचं म्हणणं आहे. इंग्लंड संघाकडून खेळणार नाही पण आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. त्यासोबत इतर लीग स्पर्धाही खेळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

6 / 7
मी आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान संघाकडून खेळलो आहे. त्यामुळे इंग्लंडकडून खेळण्याचा प्रश्नच नाही. मोहम्मद आमिरने आयपीएल 2024 मध्ये खेळण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं आहे.

7 / 7
मोहम्मद अमीरचं डिसेंबर 2020 मध्ये पीसीबी अधिकाऱ्यांशी भांडण झालं होतं. त्यानंतर त्याने तडकाफडकी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती.