आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानला मोठा फटका, दोन पराभवानंतर थेट या स्थानावर घसरण
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात येणार अशी स्थिती आहे. त्यात आसीसीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारी जाहीर केली. यात भारताचा दबदबा कायम दिसला. मात्र पाकिस्तान सलग दोन पराभवांचा फटका बसला आहे.
1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील आतापर्यंत 25 सामने पार पडले आहेत. स्पर्धेतील जवळपास निम्मा टप्पा पार पडला असून सुपर 8 फेरीसाठी चुरस वाढली आह. असं असताना आयसीसीने टी20 संघांची क्रमावारी जाहीर केली आहे. वर्ल्डकपमधील कामगिरीनंतर संघांना जबरदस्त फटका बसला आहे.
2 / 6
टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं वर्चस्व दिसून आलं आहे. दोन सामन्यात विजय मिळवून भारताने सुपर 8 फेरीच्या दिशेने कूच केली आहे. भारतीय संघ 265 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा संघ 258 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.गतविजेता इंग्लंड संघ 254 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
3 / 6
आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. सलग दोन पराभवामुळे पाकिस्तानची क्रमवारीत घसरण झाली आहे. पाकिस्तान सध्या 241 रेटिंग गुणांसह सातव्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, सुपर 8 फेरीचं स्वप्न भंगण्याचं चिन्हही आहे.
4 / 6
वेस्ट इंडिज 253 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तसेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान आणि कॅनडाचा पराभव केल्याने अमेरिकेला फायदा झाला आहे. अमेरिकेने क्रमवारीत मोठी झेप घेतली असून 17 व्या स्थानावर पोहोचला आहे.
5 / 6
टी20 वर्ल्डकपमध्ये सलग तीन विजय मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर न्यूझीलंडचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
6 / 6
नामिबिया आणि ओमानला पराभूत करणाऱ्या स्कॉटलँडने दोन स्थानांची झेप घेतली आहे . स्कॉटलँडने 12व्या स्थानावर पोहोचले. ब गटातून स्कॉटलँडचा संघ सुपर 8 फेरी गाठण्याची चिन्ह आहेत. आता नेट रनरेटवर ठरतं की विजयावर ठरतं ते पाहणं औत्सुक्याचं आहे.