पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. फ्रान्सची राजधानी या स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या इतिहासात असं काही होणार आहे, ज्यामुळे पॅरिस 2024 ची ओपनिंग सेरेमनी ऐतिहासिक ठरणार आहे. (Photo: Getty Images)
ओपनिंग सेरेमनीचं आयोजन हे बंदिस्त स्टेडियममध्ये न करता खुल्या परिसरात करण्यात येणार आहे. हे पॅरिस ऑलिम्पिकचं वैशिष्ट्य असणार आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही होणार आहे. (Photo: Getty Images)
उद्घाटन समारभांच्या मिरवणुकीत सहभागी 10 हजार 500 खेळाडू हे 100 होड्यांमध्ये दिसणार आहेत. हे चित्र पाहण्यासारखं असणार आहे. (Photo: Getty Images)
पॅरिस ऑलिम्पिकच्या ओपनिंग सेरेमनीला जवळपास 6 लाख चाहते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर ओपनिंग सेरेमनीसाठी 222000 मोफत तिकीटांची सोय करण्यात आली आहे. तसेच 104000 इतक्या तिकीटांची विक्री होणार आहे. अशाप्रकारे ऑलिम्पिकच्या इतिहासातील ही सर्वाधिक पाहिली जाणारी ओपनिंग सेरेमनी ठरणार आहे.(Photo: Getty Images)
ओपनिंग सेरेमनीसाठी पॅरिसमध्ये 80 मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तसेच जगभरातून जवळपास दीड कोटी चाहते हा उद्घाटन समारंभ पाहण्याची शक्यता आहे. (Photo: Getty Images)
ओपनिंग सेरेमनीला स्थानिक वेळेनुसार सुरुवात ही 26 जुलैला संध्याकाळी 7 पासून होणार आहे. तर भारतात या सेरेमनीला रात्री 11 वाजता सुरुवात होईल. (Photo: Getty Images)