चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाची धाकधूक वाढली, हुकूमाचा एक्का ‘आऊट’ होणार!

| Updated on: Jan 09, 2025 | 5:54 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. दुसरीकडे, इतर संघांची चाचपणी सुरु आहे. असताना ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे.

1 / 6
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबईत होणार आहे. या स्पर्धेसाठी आठ संघ सज्ज झाले आहेत. पण या स्पर्धेपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाच्या गोटात चिंतेचं वातावणर आहे. कारण बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत पॅट कमिन्स दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या गुडघ्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे.

2 / 6
पॅट कमिन्स दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या ऐवजी संघाची धुरा पॅट कमिन्सच्या खांद्यावर दिली आहे. दरम्यान, पॅट कमिन्सला गुडघा दुखापतीचा त्रास असल्याचं ऑस्ट्रेलिया निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितलं आहे.

3 / 6
स्कॅनिंग अहवालानंतर पॅट कमिन्सच्या उपचाराबाबत ठरवलं जाईल, असं जॉर्ज बेली यांनी सांगितलं. पण ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, पॅट कमिन्स गुडघ्याची दुखापत तीव्र आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याचं सांगितलं आहे.

4 / 6
पॅट कमिन्सवर शस्त्रक्रिया झाली तर महिनाभरात बरा होईल असं वाटत नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ एका अनुभवी कर्णधाराला मुकेल. फलंदाजी आणि गोलंदाजी क्षेत्रातही फटका बसेल.

5 / 6
पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका जिंकली आहे. त्यामुळे पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाचं नुकसान होऊ शकतं.

6 / 6
पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफी नसल्यास वनडे संघाचं कर्णधारपद स्टीव्ह स्मिथकडे येण्याची शक्यता आहे. संघ जाहीर करण्याची तारीखही जवळ येत आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही कसोटीचं कर्णधारपद त्याच्याकडेच आहे. 12 जानेवारीला संघ जाहीर करण्याची शक्यता आहे.