Poorvi Bhave | IPL चं 16 वं पर्व संपलं, पण ही मराठी अँकर कायम लक्षात, आवाजाने लावलेलं वेड!
Tata IPL presenter In Marathi | पूर्वी भावे यांनी आयपीएल 16 व्या मोसमात निवेदन केलं. मराठीत क्रिकेट प्री मॅच शो चं निवेदन करणाऱ्या त्या पहिल्या निवेदिका ठरल्या आहेत.
1 / 8
आयपीएल 16 वा मोसम नुकताच पार पडला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर शेवटच्या बॉलवर सनसनाटी विजय मिळवला. यंदा जिओ सिनेमावर मोफत आयपीएल सामने पाहायला मिळाल्याने पाहणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती.
2 / 8
तसेच 14 स्थानिक भाषांमध्ये क्रिकेट चाहत्यांना सामन्यांसह कॉमेंट्री ऐकण्याचाही अनुभव घेता आला. त्यामुळे या निमित्ताने त्या त्या भाषेतील अनुभवींना समालोचन करण्याची संधी मिळाली. यामुळे आधी टीव्ही पत्रकार राहिलेल्या पूर्वी भावे यांना मराठीतून आयपीएलची कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली. यासह पूर्वी भावे यां मराठीतील पहिल्या महिला समालोचक ठरल्या.
3 / 8
पूर्वी भावे यांनी किरण मोरे, केदार जाधव, धवल कुलकर्णी आणि सिद्धेश लाड यांच्यासह आयपीएल सामन्यांची कॉमेंट्री केली.
4 / 8
पूर्वी भावे यांनी पत्रकारितेत असताना रितेश देशमुख, हर्षा भोगले, अतुल कुलकर्णी, आमिर खान, अशा अनेक व्यक्तिमतत्वांच्या मुलाखती घेतल्या.
5 / 8
पूर्वी भावे यांनी वृत्तवाहिनीतीली नोकरी सोडल्यानंतर निवेदिका आणि अभिनेत्री म्हणून आपलं स्थान बनवायला सुरूवात केली. या काळात मराठी वृत्तवाहिनीने तिचा “घे भरारी” हा खास शो सुरू केला आणि निवेदिका म्हणून तिचा चेहरा घराघरात पोहोचला.
6 / 8
पूर्वी भावे यांनी यानंतर जल्लोष सुवर्णयुगाचा हा रिएलिटी शो, मेजवानी परिपूर्ण किचन, आकाशवाणी झकासवाणी, स्वीट होम, गुणगुण गाणी अशा अनेक कार्यक्रमांमध्ये निवदेक म्हणून जबाबदारी सांभाळली.
7 / 8
तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, शासकिय आणि कॉर्पोरेट इव्हेंटस्, अवॉर्ड सेरेमनीज, मोठेफिल्म फेस्टिव्हल्स यासाठीही निवेदन केलं. या दरम्यान ए आर रेहमान, रोहित शेट्टी, आशा भोसले, शंकर महादेवन, अमित त्रिवेदी, सचिन पिळगावकर, सुमित राघवन, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी यांची मुलाखत घेतली आहे. शिवाय माधुरी दिक्षित यांची मुलाखत घेण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला.
8 / 8
आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणं पूर्वी यांच्यासाठी आगळीवेगळी संधी होती. पूर्वी यांनी खेळाशी संबंधित कार्यक्रम केले आहेत. पण आयपीएल स्पर्धेचं निवेदन हे एक वेगळं आव्हान होतं. मात्र हे आव्हान पूर्वी यांनी उत्तमरित्या पेललं. दरम्यान असे स्पोर्टसं तसंच टेलिव्हिजन रिएलिटी शो करायची तिला प्रचंड इच्छा आहे तेही लवकरच घडेल याची खात्री पूर्वी यांना आहे.