Pro Kabaddi 2023-24 : बंगाल वॉरियर्स विजयी , तेलुगू टायटन्सचा केला असा पराभव
प्रो कबड्डी लीग आता रंगतदार वळणावर आली आहे. प्लेऑफसाठी आता 12 संघामध्ये चुरस आहे. त्यात 22 पैकी जवळपास प्रत्येक संघ 11 सामने खेळला आहे. त्यामुळे प्रत्येक सामना आता महत्त्वाचा आहे.
1 / 6
प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामातील 64 वा सामना बंगाल वॉरियर्स आणि तेलुगु टायटन्स यांच्यात मुंबईतील एनएससीएल स्टेडियमवर खेळला गेला.
2 / 6
प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या पर्वात बंगाल वॉरियर्स संघ विजयासाठी कसोशीने प्रयत्न करत होता. अखेर या सामन्यात बंगाल वॉरियर्सने विजय नोंदवला आणि तेलुगू टायन्सचा पराभव केला.
3 / 6
बंगालने तेलुगू टायटन्सचा 20 गुणांच्या फरकाने पराभव केला. बंगालने तेलुगू टायटन्सचा 46-26 असा पराभव केला. तेलुगू टायटन्सने नाणेफेक जिंकून कोर्टवर राहण्याचा निर्णय घेतला. बंगाल वॉरियर्सने पहिला चढाई केली त्यात यश मिळालं नाही.
4 / 6
पूर्वार्धानंतर बंगालची तेलुगूवर 17 गुणांची आघाडी होती. मात्र उत्तरार्धात तेलुगू टायटन्सने काहीसे पुनरागमन केले. बंगालच्या बाजूने वैभव गर्जेच्या खेळाने तेलुगूला पिछाडीवर टाकले.
5 / 6
या विजयासह बंगालचा संघ गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. तर पराभवासह तेलुगू टायटन्स शेवटच्या स्थानावर आहे.
6 / 6
गेल्या सामन्यात बंगालला हरियाणा स्टीलर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. 41-35 च्या फरकाने पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.