PSL 2023 मध्ये तुफान आणि वादळ, जेसन रॉय याची झंझावाती खेळी, बाबर याची शतकी खेळी वाया

| Updated on: Mar 09, 2023 | 4:49 PM

पाकिस्तान सुपर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. जेसन रॉय याने या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली.

1 / 5
पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत बुधवारी धावांचं वादळ पाहायला मिळालं. एका सामन्यात दोन्ही संघांकडून प्रत्येकी 1 अशी 2 शतकं. 470 पेक्षा अधिक धावा. बाबर आझम याने ठोकलेलं शतक जेसन रॉय याच्या झंझावाती खेळीसमोर व्यर्थ ठरलं.  क्रिकेट चाहत्यांना थरार पाहता आला.

2 / 5
पेशावर जाल्मी विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात हा सामना खेळवण्यात आला. क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या जेसन राय याने पीएसएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठोकत इतिहास रचला. जेसनने 63 बॉलमध्ये नाबाद 145 धावांची खेळी करत टीमला सनसनाटी विजय मिळवून दिला.

3 / 5
पेशावर जाल्मीने क्वेटा ग्लॅडिएटर्सला विजयासाठी 241 धावांचं लक्ष्य मिळालं. या आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या सलामी फलंदाज जेसन रॉय याने तोडफोड बॅटिंग केली. रॉयने अवघ्या 44 बॉलमध्ये शतक ठोकलं. तसेच शेवटपर्यंत नाबाद राहत टीमला 10 बॉलआधी विजय मिळवून दिला. जेसनने 19 व्या ओव्हरमध्ये सिक्स खेचत विजयी केलं. रॉयने 63 बॉलमध्ये नाबाद 145 धावांची खेळी केली. या खेळीत 20 चौकार आणि 5 सिक्स ठोकले.

4 / 5
रॉयने या दरम्यान मोहम्मद हफीज सोबत 93 धावांची भागादारी करत विजय सोपा केला. या स्पर्धेतील ही विक्रम आणि यशस्वी पाठलाग ठरला. या सामन्यात  एकूण 483 धावा झाल्य, जो पीएसएल स्पर्धेत इतिहास ठरला.

5 / 5
त्याआधी पेशावर जाल्मीचा कर्णधार बाबर आझम याने 65 बॉलमध्ये 115 धावांची शतकी खेळी केली.  यात 15 चौकार आणि 3 सिक्सचा समावेश होता.  मात्र जेसनच्या झंझावातासमोर बाबरची शतकी खेळी व्यर्थ गेली.