4 खेळाडू करणार कीर्तीमान, टीम इंडियाच्या एकाचा समावेश, इतर 3 कोण?
100 Test Match | 7 आणि 8 मार्च रोजी 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. धर्मशालेत 7 मार्च रोजी टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडिया आणि इंग्लंड दोन्ही संघांतील 1-1 खेळाडूसाठी ऐतिहासिक सामना असणार आहे. त्यानंतर 8 मार्चला ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना होणार आहे. या सामन्यातून 2 खेळाडू कसोटीतील अनोखं शतक पूर्ण करणार आहे.