कसोटी सामन्यात आर अश्विनच्या फिरकीची जादू कायम अनुभवायला मिळाली आहे. फिरकीवर त्याने विरोधी संघाच्या फलंदाजांना नाचवलं आहे. आर अश्विन दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीराचा पुरस्कार जिंकण्याचा मान श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. श्रीलंकेच्या दिग्गज फिरकीपटून 61 मालिका खेळल्या असून त्यापैकी 11 मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
आर अश्विन याने आपल्या फिरकीची जादू कसोटी मालिकांमध्ये दाखवली आहे. आर अश्विन आतापर्यंत 39 कसोटी मालिका खेळला आहे. यात त्याने 10 वेळा मालिकावीराचा पुरस्कार जिंकला आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी आर अश्विन सज्ज आहे. 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या मालिकेत भारत दोन सामने खेळणार आहे. या मालिकेत आर अश्विनने चमकदार कामगिरी केली तर त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळू शकतो.
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिकावीराचा पुरस्कार मिळाला तर तो मुथय्या मुरलीधरणच्या विक्रमाची बरोबरी करेल. तसेच कमी मालिकांमध्ये असा विक्रम करणारा पहिला खेळाडू ठरेल.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशवी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.