IND vs ENG : आर अश्विनने 2011 साली घेतली होती पहिली कसोटी विकेट, समोर होता हा खेळाडू

| Updated on: Feb 16, 2024 | 9:07 PM

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जॅक क्राउलीला बाद करत आर अश्विनने 500 विकेट्सचा पल्ला गाठला. 13 वर्षापूर्वी म्हणजेच 2011 साली आर अश्विनने पहिली कसोटी विकेट घेतली होती. आता हा प्रवास 500 विकेट्सपर्यंत पोहोचला आहे. येत्या काही सामन्यात हा प्रवास आणखी पुढे जाईल. तुम्हाला माहिती आहे का? आर अश्विनने कसोटीत पहिली विकेट कोणाची घेतली होती? नसेल तर जाणून घ्या

1 / 6
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या डावात टीम इंडियाने 445 धावा केल्या. त्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 2 गडी गमवून 207 धावा केल्या आहेत. अजूनही भारताकडे 238 धावांची आघाडी आहे. आर अश्विनने एक गडी बाद करत 500 विकेट्सचा पल्ला गाठला आहे.

2 / 6
आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये जलद 500 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. 98 कसोटी सामन्यात आर अश्विनने ही किमया साधली आहे. मुरलीधरनने 500 विकेट्स 87 सामन्यात घेतले होते.

3 / 6
आर अश्विनने आपला पहिला कसोटी सामना 2011 साली खेळला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाजी करताना पहिली विकेट आपल्या नावावर केली होती. या सामन्यात डॅरेन ब्रावोला बाद विकेट्सचा नारळ फोडला होता. त्यानंतर प्रवास सुरु केला तेथून मागे वळून पाहिलं नाही.

4 / 6
अश्विनची  100 वी वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी, 200 वी विकेट  न्यूझीलंडचा केन विल्यमसन, 300 वी विकेट श्रीलंकेचा लाहिरू गमगे, 400 वी विकेट इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि 500 विकेट इंग्लंडचा जॅक क्राउली राहिला.

5 / 6
आर अश्विनने आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दित 34 वेळा पाच गडी बाद करण्याची किमया साधली आहे. वनडे क्रिकेटमध्ये 156 विकेट, तर टी20 क्रिकेटमध्ये 72 गडी बाद केले आहेत.

6 / 6
कसोटी क्रिकेटमध्ये कमी चेंडूत 500 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांचा यादीत आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. ग्लेन मॅक्ग्राने 25528 चेंडूत, आर अश्विनने 25714 चेंडूत, जेम्स अँडरसनने 28150 चेंडूत, स्टुअर्ट ब्रॉडने 28430 चेंडूत, तर कर्टनी वॉल्शने 28833 चेंडूत 500 गडी बाद केले आहेत.