IND vs NZ : मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी दिग्गजांची हजेरी, रजनीकांत-बेकहम यांची उपस्थिती
दिनेश दुखंडे, (प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी ): भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना सुरु आहे. या सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं आहे. तसेच दोन गडी बाद करण्यात मोहम्मद शमीला यश आलं आहे. हा सामना पाहण्यासाठी दिग्गजांनी उपस्थिती लावली आहे.
1 / 8
मुंबईतील वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी दिग्गजांना उपस्थिती लावली आहे. दिग्गज फुटबॉलपटू डेविड बेकहम यांनी या सामना पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. बेकहम आणि सचिन तेंडुलकर यूनिसेफसह जोडले आहेत.
2 / 8
दिग्गज फुटबॉलपटू डेव्हिड बेहकम हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसोबत दिसला. बेहकमने भारतीय संघाचीही भेट घेतली.
3 / 8
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीने सचिनच्या शतकांचा विक्रम मोडीत काढला. हा क्षण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी प्रेक्षक गॅलरीतून पाहिला.
4 / 8
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांनीही उपस्थिती लावली आहे. रजनीकांत हे देखील सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित आहेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं गोल्डन तिकीट त्यांना दिलं होतं.
5 / 8
धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि तिचा पती यांनीही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली आहे. कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम, रणबीर कपूर, कुणाल खेमू, शाहिद कपूर, व्यंकटेश दगुबत्ती, विवियन रिचर्डस पोहोचले आहेत.
6 / 8
शिखर धवन, दुखापतग्रस्त असलेला हार्दिक पांड्या हा देखील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहण्याासाठी उपस्थित आहे.
7 / 8
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी उद्योगपती, राजकीय नेते आणि इतर मान्यवरांनीही उपस्थिती लावली आहे.
8 / 8
अमृता फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी वानखेडेमध्ये टिम इंडीयाला प्रोत्साहन दिलं.