अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खानने टी20 क्रिकेटमध्ये आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. त्याने या विक्रमाची नोंद इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या हंड्रेड लीगमध्ये केली. या लीगमध्ये त्याने 600 विकेट्सचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फिरकीपटू ठरला आहे.
600 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत राशीद खान पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. कमी डावात त्याने हे यश संपादित केलं आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होच्या नावावर होता.
वेस्ट इंडिज, आयपीएल, सीपीएल, बिग बॅश लीग, पीएसएल यासह अनेक लीगमध्ये खेळलेल्या ड्वेन ब्राव्होने 545 टी20 सामन्यांतून 600 बळी घेतले आहेत. आता हा विक्रम मोडण्यात राशिद खानला यश आले आहे.
आयपीएल, सीपीएल, बिग बॅश, पीएसएल यासह जगातील प्रमुख लीगमध्ये खेळलेल्या अफगाणिस्तानच्या फिरकीपटूने केवळ 441 टी20 सामन्यांमध्ये 600 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यासह ब्राव्होच्या नावावरचा असलेला विक्रम आपल्या नावावर केला आहे.
दुसरीकडे, टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ड्वेन ब्राव्हे अव्वल स्थानी आहे. त्याने 543 डावात 630 विकेट्स घेतल्या आहे. आता हा विक्रम मोडण्यासाठी राशीदला आणखी 31 गडी बाद करावे लागतील.