Ravi Bishnoi : अश्विनपेक्षा दुप्पट विकेट घेतो, तरीही विश्वचषकासाठी निवड नाही
रवींद्र जडेजाच्या जागी विश्वचषक संघात आलेला अक्षर पटेल या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या विश्वचषकापासून पटेलने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि 12 विकेट घेण्यात यश मिळवले आहे.
1 / 3
ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताने या संघात तीन फिरकी गोलंदाजांची निवड केली असून त्यापैकी एक अनुभवी रविचंद्रन अश्विन आहे. पण अश्विनपेक्षा जास्त विकेट न घेतलेल्या फिरकीपटूला संघात स्थान मिळालेले नाही. तो कोण आहे आणि त्याच्या नावावर अश्विनपेक्षा किती विकेट्स आहेत.
2 / 3
हा फिरकीपटू म्हणजे रवी बिश्नोई. गेल्या T20 विश्वचषकापासून आतापर्यंतच्या T20 आंतरराष्ट्रीय कामगिरीवर नजर टाकली तर बिश्नोईने अश्विनपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने 10 टी-20 सामने खेळले असून 16 विकेट्स घेतल्या आहेत.
3 / 3
अश्विनची गेल्या टी-20 विश्वचषकापासून आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर त्याने सात टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याला केवळ आठ विकेट घेता आल्या आहेत. युझवेंद्र चहल गेल्या टी-20 विश्वचषकानंतरच्या कामगिरीत नंबर 1 फिरकी गोलंदाज आहे. या लेगस्पिनरने तेव्हापासून 17 सामने खेळले असून 20 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे.