IND vs SL: अश्विनच्या निशाण्यावर कपिल देवनंतर अनिल कुंबळेचा विक्रम, श्रीलंकेविरुद्ध बंगळुरूमध्ये मोठी संधी!
मोहालीत कपिल देवचा विक्रम मोडल्यानंतर अश्विनच्या निशाण्यावर आता अनिल कुंबळेचा विक्रम आहे. रोहित शर्माचा 400 वा आंतरराष्ट्रीय सामना आणि श्रीलंकेचा संघ अश्विनचा आणखी एका खास गोष्टीचा साक्षीदार होऊ शकतो.
1 / 5
मोहालीत कपिल देवचा विक्रम मोडल्यानंतर अश्विनच्या निशाण्यावर आता अनिल कुंबळेचा विक्रम आहे. रोहित शर्माचा 400 वा आंतरराष्ट्रीय सामना आणि श्रीलंकेचा संघ अश्विनचा आणखी एका खास गोष्टीचा साक्षीदार होऊ शकतो. आता तुम्ही विचार करत असाल अनिल कुंबळेचा असा कोणता विक्रम आहे जो अश्विनच्या आवाक्यात आहे.
2 / 5
मोहालीत श्रीलंकेविरुद्ध 100 आंतरराष्ट्रीय बळींचा टप्पा ओलांडणारा अश्विन आता बंगळुरूमध्ये विकेट्सच्या शर्यतीत कुंबळेला मागे टाकू शकतो. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या जगातील 6 आणि 3 भारतीय गोलंदाजांमध्ये अश्विनची नजर आता कुंबळेच्या रेकॉर्डवर आहे.
3 / 5
अनिल कुंबळेने श्रीलंकेविरुद्ध 108 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या नावावर सध्या श्रीलंकेविरुद्ध 101 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. अशा परिस्थितीत अश्विनने बंगळुरू कसोटीतील दोन्ही डावात मिळून 7 विकेट घेतल्यास तो कुंबळेला मागे टाकू शकेल.
4 / 5
बंगळुरू कसोटी गुलाबी चेंडूने खेळवली जाणार असल्याने अश्विनला तसे करणे शक्य आहे. कारण गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या 3 कसोटीत अश्विन सर्वाधिक 12 बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे.
5 / 5
श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक 155 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या वसीम अक्रमच्या नावावर आहे. तर हरभजन सिंग 114 विकेट्ससह भारतीयांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. (All Photo: AFP)