ऑस्ट्रेलियात रवींद्र जडेजा सचिन-विराटपेक्षा ठरला सरस, आकडेवारी पाहून तुम्हीही तसंच म्हणाल

| Updated on: Dec 17, 2024 | 4:13 PM

गाबा कसोटीत केएल राहुनंतर रवींद्र जडेजाने भारताचा डाव सावरला. भारतीय संघ संकटात असताना अर्धशतकी खेळी. त्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या करता आली आणि फॉलोऑन टाळण्यास मदत झाली. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियात तिसरं अर्धशतक ठोकलं आहे.

1 / 5
ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथा दिवसांचा खेळ संपला.भारताने 445 धावांचा पाठलाग करताना 9 गडी बाद 252 धावा केल्या. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 193 धावांची आघाडी आहे. आता भारत पाचव्या दिवशी कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. या सामन्यात केएल राहुलने 84, तर रवींद्र जडेजाने 77 धावांची खेळी केली.

2 / 5
तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाज करताना रवींद्र जडेजाला काही यश आलं नाही. पण फलंदाजीत रवींद्र जडेजाने अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. या खेळीनंतर रवींद्र जडेजाने सचिन आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे सोडलं आहे.

3 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियात रवींद्र जडेजाची सरासरी 56.75 इतकी आहे. सचिन तेंडुलकरची सरासरी 5320, तर विराट कोहलीची सरासरी 50.96 इतकी आहे. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियात 5 सामन्यात 6 डावात 227 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकं झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्या 81 आहे.

4 / 5
केएल राहुलच्या अर्धशतकानंतर रवींद्र जडेजा याने अर्धशतकी खेली. गाबा कसोटीत जडेजाने 88 चेंडूत अर्धशतक ठोकलं. यावेळी त्याच्या बॅटमधून 6 चौकार आले. रवींद्र जडेजाने बॅट स्विंग करून अर्धशतक साजरे केले.

5 / 5
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाला संधी मिळाली नाही. मात्र, रोहित शर्माने त्याला गाबा कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले.ऑस्ट्रेलियाच्या डावात जडेजाने 23 षटके टाकली. पण विकेट मिळाली नाही.