टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 15 वर्षात रवींद्र जडेजा फेल, जाणून घ्या आतापर्यंतची कामगिरी
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताने चांगली कामगिरी केली. पण रवींद्र जडेजाची कामगिरी चिंतेचा विषय ठरली आहे. 2009 पासून रवींद्र जडेजा टी20 वर्ल्डकप खेळत आहे. 2022 चा वर्ल्डकप वगळला तर प्रत्येक टी20 वर्ल्डकपमध्ये संघांचा भाग होता. या सर्व पर्वात रवींद्र जडेजा फेल ठरला आहे.
1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करत सुपर 8 फेरीच्या दिशेने कूच केली आहे. आयर्लंडनंतर पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
2 / 6
टी20 वर्ल्डकप संघात रवींद्र जडेजाचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. संघात असून नसल्यासारखा दिसत आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणारा रवींद्र जडेजा आयसीसी चषकात मात्र फेल ठरत आहे. गेली 15 वर्षे रवींद्र जडेजा वर्ल्डकप खेळत आहे. मात्र फलंदाजीत त्याचं योगदान काहीच नाही.
3 / 6
न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्रत्येक धाव महत्त्वाची होती. प्रथम फलंदाजी आल्याने मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं होतं. पण खेळपट्टी पाहता प्रत्येक धाव गरजेची होती. संघासाठी थोडसं योगदानही महत्त्वाचं ठरलं असं सामन्यानंतर दिसून आलं. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आपल्या प्रत्येक फलंदाजाच्या योगदानाची गरज होती.
4 / 6
रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे झटपट बाद झाले. त्यामुळे मधल्या फळीतील रवींद्र जडेजाकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. संघ संकटात असताना रवींद्र जडेजाचं योगदान मात्र शून्य राहिलं. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही.
5 / 6
रवींद्र जडेजा जेव्हा मैदानात उतरला तेव्हा जवळपास सहा षटकं शिल्लक होती. जडेजाला चांगली खेळी करण्याची संधी होती. पण जडेजाने गेल्या 15 वर्षातील सुमार कामगिरीचा कित्ता गिरवला. त्यामुळे त्याच्यावर वारंवार विश्वास ठेवणं संघाला महागात पडू शकतं.
6 / 6
टी20 विश्वचषकात आतापर्यंत 10 डाव खेळणाऱ्या जडेजाने 99 चेंडूत फक्त 95 धावा केल्या आहेत. त्यात 6 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश आहे. दुसरीकडे, गोलंदाजीत त्याचं योगदान आहे. 21 विकेट्ससह जडेजा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.