IND vs ENG : आरसीबीचे तीन खेळाडू पहिल्याच सामन्यात फेल, विराट कोहलीचं टेन्शन वाढलं!

| Updated on: Jan 22, 2025 | 10:09 PM

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच इंग्लंडला 132 धावांवर गुंडाळलं. हे आव्हान भारताने 3 गडी गमवून पूर्ण केलं. पण या सामन्यात आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

1 / 6
भारत विरुद्ध इंग्लंड टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताच्या पारड्यात गेला. इंग्लंडचे दिग्गज खेळाडू पहिल्याच सामन्यात फेल गेले. कर्णधार जोस बटलर वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. निम्म्याहून अधिक खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

2 / 6
इंग्लंडची निराशाजनक कामगिरी पाहून आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे. इंग्लंडच्या प्लेइंग 11 मधील तीन खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार आहेत. या तिघांसाठी आरसीबीने कोट्यवधी रुपये मोजले आहेत. पण तिन्ही फलंदाज फेल गेले.

3 / 6
मेगा लिलावात आरसीबीने फिल सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टन आणि जेकब बेथेल यांच्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले. फिल सॉल्टसाठी 11.50 कोटी रुपये, लियाम लिव्हिंगस्टनसाठी 8.75 कोटी रुपये आणि जेकब बेथेलसाठी 2.60 कोटी रुपये मोजले. तीन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी आरसीबीने 22.85 कोटी रुपये खर्च केले.

4 / 6
आयपीएल हंगामात फिल सॉल्टने स्फोटक फलंदाजी केली होती. सलामीवीर म्हणून खूप धावा केल्या. मात्र या सामन्यात त्याने केवळ 3 चेंडूंचा सामना केला आणि खाते न उघडता बाद झाला. अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात सॉल्टला गोलंदाजी दिली.

5 / 6
लियाम लिव्हिंगस्टनही सॉल्टसारखा काहीही न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. फक्त 2 चेंडूंचा सामना केला आणि खाते न उघडता तंबूत आला. वरुण चक्रवर्तीच्या गुगलीचा सामना करताना लिव्हिंगस्टन चाचपडला आणि क्लीन बोल्ड झाला.

6 / 6
अष्टपैलू जेकब बेथेलही प्रभावी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. बेथेलने खाते उघडले पण धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला. त्यांच्या डावात 14 चेंडूंचा सामना करत, बेथेलला 50 च्या स्ट्राइक रेटने फक्त 7 धावा करता केल्या. हार्दिक पांड्याने त्याला चालतं केलं.