पश्चाताप..! आरसीबीने रिलीज केलेल्या खेळाडूचा कहर, अशी कामगिरी केली की…
आरसीबीने 18 व्या पर्वासाठी मोर्चेबांधणी केली आहे. 17 पर्व जेतेपदाशिवाय गेली. त्यामुळे संघाची नव्याने बांधणी सुरु केली आहे. आरसीबीने तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. विराट कोहली 21 कोटी, रजत पाटीदार 11 कोटी आणि यश दयालला 5 कोटी रुपये देत रिटेन केलं आहे. पण एका खेळाडूला रिलीज केल्याचा पश्चाताप आरसीबीला नक्कीच होत असेल.
1 / 6
आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी आरसीबीने अष्टपैलू महिपाल लोमरारला रिलीज करून मोठी चूक केल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण महिपाल फॉर्मात असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे. कारण रणजी स्पर्धेत त्याने 357 चेंडूत त्रिशतक ठोकलं. यात 13 षटकार आणि 25 चौकार मारले.
2 / 6
ब गटातील एलिट सामन्यात उत्तराखंड आणि राजस्थान आमनेसामने आले होते. राजस्थानकडून खेळताना महिपालने त्रिशतक ठोकलं. महीपालचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलं त्रिशतक आहे.
3 / 6
आरसीबीने रिलीज केल्यानंतर महिपालची ही खेळी पाहून पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. कारण महिपालचा फॉर्म पाहता इतर फ्रेंचायझी त्याच्यावर डाव लावणार यात शंका नाही. सौदी अरेबियात 24 आणि 25 नोव्हेंबरला मेगा लिलाव पार पडणार आहे. विशेष म्हणजे महिपाल हा अनकॅप्ड प्लेयर असल्याने त्याच्यासाठी जास्त पैसे मोजावे लागले नसते.
4 / 6
महिपाल आरसीबीव्यतिरिक्त राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. त्याने 40 आयपीएल सामन्यात 18.17 च्या सरासरीने 527 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
5 / 6
मागच्या दोन पर्वात आरसीबीने त्याला भरपूर संधी दिली. पण लोमरोरला काही खास करता आलं नाही. मागच्या आयपीएल पर्वात 10 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने 15.62 च्या सरासरीने 125 धावा केल्या.
6 / 6
महिपाल लोमरर हा अष्टपैलू खेळाडू आहे ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 55 बळी घेतले आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये 11 आणि टी-20 मध्ये 9 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, आयपीएलमध्ये त्याच्या नावावर आतापर्यंत फक्त 1 विकेट आहे.