IPL 2024 : माझ्या चुकीमुळे तसं घडलं! रॉयल चॅलेंजर्सचं जेतेपदाचं स्वप्न भंगल्याने मागितली माफी
आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची स्थिती एकदम नाजुक आहे. एका पराभवानंतर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल, अशी स्थिती आहे. आतापर्यंत आरसीबीने तीनवेळा अंतिम फेरी गाठली मात्र जेतेपद मिळवता आलं नाही. 2009, 2011 आणि 2016 रोजी ही संधी चालून आली होती. मात्र जेतेपदावर नाव कोरता आलं नाही.
1 / 8
2016 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले होते. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता.
2 / 8
सनरायझर्स हैदराबादने 16.2 षटकात 150 धावा केल्या होत्या. आरसीबीने धावांची गती नियंत्रणात ठेवली होती. पण 19 व्या षटकापर्यंत ही धावसंख्या 184 वर पोहोचली.
3 / 8
शेवटचं षटक शेन वॉटसनच्या हाती सोपवलं होतं. या षटकात बेन कटिंगने सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. कटिंगने 4,6,6,1,1,6 धावा केल्या. सनराझर्स हैदराबादने 20 षटकात 7 गडी गमवून 208 धावा केल्या.
4 / 8
209 धावांच्या पाठलाग करताना आरसीबीने 10.3 षटकात 114 धावा केल्या. ख्रिस गेल (76) धावा, तकर विराट कोहली (54) धावांवर बाद झाला. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स (5) आणि केएल राहुल (11) करून तंबूत परतले.
5 / 8
आरसीबीने 15.3 षटकांत 160 धावा केल्या. त्यामुळे आरसीबीला विजयाची चांगली संधी होती. पण गोलंदाजीत महागडा ठरलेला शेन वॉटसन फलंदाजीतही अपयशी ठरला. फक्त 11 धावा करून बाद झाला. अखेर आरसीबीने 20 षटकात 7 गडी गमावून 200 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीचा 8 धावांनी पराभव झाला.
6 / 8
आरसीबीने प्रथमच चॅम्पियन बनण्याची संधी केवळ 8 धावांनी गमावली. आरसीबीचा माजी खेळाडू शेन वॉटसन म्हणाला की, या पराभवाचा मला अजूनही पश्चाताप होत आहे.
7 / 8
शेन वॉटसन म्हणाला, 2016 मध्येच आरसीबी संघाने चषक जिंकायला हवा होता. पण त्या दिवशी मी 4 षटकात 61 धावा दिल्या. शेवटच्या षटकात २४ धावा आरसीबीला महागात पडल्या.
8 / 8
माझ्या खराब कामगिरीमुळे आरसीबीने पहिल्यांदाच चषक जिंकण्याची संधी गमावली. संधी गमावल्याबद्दल मी आरसीबीच्या चाहत्यांची माफी मागतो,” शेन वॉटसन म्हणाला.