कमबॅकसह तोडला रेकॉर्ड, दिग्गज खेळाडूला टक्कर?
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये क्रिस गेलच्या नावावर अनेक विक्रम आहेत. सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्यानं केलाय. आता हा विक्रम गेलच्या नावावर नाही. त्याचा विक्रम त्याच्याच देशाच्या खेळाडूनं मोडलाय.
1 / 5
कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये क्रिस गेलच्या नावावर अनेक विक्रम आहेत. यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही त्यानं केलाय. आता हा विक्रम गेलच्या नावावर नाही. कारण, त्याचा विक्रम त्याच्याच देशाच्या एका खेळाडूनं मोडलाय.
2 / 5
तुम्हाला हे माहिती आहे का? की, वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज एविन लुईस सीपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरलाय. सीपीएलमध्ये त्याचे एकूण 173 षटकार आहेत. त्यानं हे सर्व षटकार 86 सामन्यात मारले आहे. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सकडून खेळताना लुईसनं सेंट लुसिया किंग्जविरुद्ध दोन षटकार मारून हा विक्रम केलाय.
3 / 5
लुईस नुकताच टी-20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघात परतलाय. सीपीएलमधील 85 सामन्यांमध्ये गेलच्या नावावर 172 षटकार आहेत.
4 / 5
सीपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजचा केरन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डनं या लीगमध्ये आतापर्यंत 100 सामने खेळले असून 152 षटकार मारले आहेत. तो गेलच्या 20 षटकारांनी मागे आहे.
5 / 5
चौथ्या क्रमांकावर लेंडल सिमन्स आहे. यानं 93 सामन्यात 133 षटकार ठोकले आहेत. पाचव्या क्रमांकावर आंद्रे रसेल आहे. यानं 84 सामन्यांत 124 षटकार ठोकले आहेत.