INDW vs SAW : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामन्यात विक्रमांचा पाऊस, एकाच सामन्यात 646 धावा आणि बरंच काही
भारत आणि दक्षिण अफ्रिका महिला संघात एकदिवसीय सामना रंगला. हा सामना भारताने अवघ्या चार धावांनी जिंकला. पण या सामन्याची रंगत काही वेगळीच होती. शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारेल हे काही सांगता येत नव्हतं. अखेर भारताला विजय मिळाला. पण या सामन्यात बरेच विक्रम नोंदवले गेले.
1 / 7
भारत आणि दक्षिण अफ्रिका महिला संघात वनडे मालिका सुरु आहे. तीन सामन्यांची मालिका भारताने 2-0 ने जिंकली आहे. पण दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी चांगलंच झुंजवलं. भारताने 3 गडी गमवून 325 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने 6 बाद 321 धावा केल्या आणि भारताने 4 धावांनी विजय मिळवला.
2 / 7
दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण अफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर उभी होती. 325 धावांचं टार्गेट सहज गाठेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. पण या सामन्यात जयपराजय झाला असला तरी काही विक्रम नोंदवले गेले आहेत. दोन्ही संघांनी मिळून 646 धावा केल्या आहेत. तर 4 शतकं ठोकली आहेत.
3 / 7
महिला वनडे क्रिकेटमध्ये चार शतकं ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. भारताकडून हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी शतकं झळकावली. तर दक्षिण अफ्रिकेकडून लॉरा वूलवर्थ आणि मारिजाने कॅपने शतक ठोकलं.
4 / 7
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध स्मृती मंधाना हीचं सलग दुसरं शतक आहे. स्मृती मंधानाने 120 चेंडूचा सामना केला. 18 चौकार आणि 2 षटकरांसह 136 धावा केल्या.
5 / 7
कर्णधार हरमनप्रीत कौरनेही 88 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 103 धावा केल्या. तसे तिसऱ्या विकेटसाठी या दोघांमध्ये 136 चेंडूत 171 धावांची विक्रमी भागीदारीही झाली.
6 / 7
भारताने विजयासाठी ठेवलेल्या 326 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोहलवर्डने नाबाद 135 धावा केल्या. पण विजयासाठी 4 धावा तोकड्या पडल्या. तिने आपल्या खेळीत 12 चौकार आणि तीन षटकार मारले.
7 / 7
कर्णधार लॉरा वोहलवर्ड हीला मारिजने कॅपची साथ लाभली. तिने 94 चेंडूत 114 धावा केल्या. यात 11 चौकार आणि तीन षटकार ठोकले. कॅप बाद झाल्यानंतर टीम इंडियाला सामन्यावर पकड मिळवता आली.