Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेबाबत मोठी अपडेट, भारत पाकिस्तान सामन्यासाठी असे असतील पर्याय

| Updated on: Sep 05, 2023 | 10:24 PM

श्रीलंकेत पावसाच्या व्यत्ययामुळे आशिया कप स्पर्धेच्या नियोजन बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे सध्या तरी बदल होणार नाही.

1 / 6
श्रीलंकेत होणाऱ्या पावसामुळे आशिया कप स्पर्धेतील सामने पाण्यात गेले असंच म्हणावं लागेल. भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे सुपर 4 फेरीचे आणि अंतिम सामन्याच्या ठिकाणात बदल केला जाईल, अशी चर्चा आहे.

2 / 6
आशिया क्रिकेट काउंसिलने याबाबत अधिकृत अशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे यात कोणता बदल होईल असं सध्यातरी स्पष्ट नाही. म्हणजे सामने कोलंबोतच खेळले जातील.

3 / 6
सुपर 4 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल. हा सामना 10 सप्टेंबरला होणार असून दोन्ही संघ कोलंबोमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

4 / 6
पल्लेकेले आणि कोलंबो येथे पावसाचा अंदाज पाहता सुपर 4 आणि अंतिम सामना हम्बनटोटा येथे आयोजित केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण या ठिकाणी पाऊन नसेल असं सांगितलं जात आहे. पण एसीसीने वेळापत्रकात कोणताही बदल केलेले नाही.

5 / 6
श्रीलंकेत पावसाचा अंदाज पाहता पीसीबीने चेअरमन जका अशरफ यांनी बीसीसीआय सचिव आणि एसीसी अध्यक्ष जय शाह यांना सामना दुबईत आयोजित करण्यास सांगितलं होतं. पण वेळापत्रकात कोणताच बदल केलेला नाही.

6 / 6
2 सप्टेंबरला भारत पाकिस्तान यांच्यात झालेला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. आता 10 सप्टेंबरला पाऊस पडू अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी करत आहेत.