आयसीसी वनडे वर्ल्ड कप फायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा अपवाद वगळता 2023 वर्ष टीम इंडियाच्या नावावर राहिलं. आता टीम इंडियासाठी 2024 हे वर्ष फार महत्त्वाचं असणार आहे. या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. या वर्षात टी 20 वर्ल्ड कपही होणार आहे. त्यामुळे संधी मिळाल्यास टीम इंडियाची चौकडी धमाका करेल, अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.
शुबमन गिल याने 2023 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने टी 20 क्रिकेटमध्ये 2023 या वर्षात 1 शतकासह 312 धावा केल्या.
सूर्यकुमार यादव याने 2023 मध्ये टीम इंडियासाठी टी 20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या. सूर्याने 18 सामन्यांमध्ये 2 शतकं आणि 5 अर्धशतकासंह 733 धावा केल्या. त्यामुळे सुर्याकडून या वर्षातही तोडफोड कामगिरी अपेक्षित असणार आहे.
यशस्वी जयस्वाल याने 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. यशस्वीने 15 टी 20 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 430 धावा केल्या. यशस्वी टी 20 वर्ल्ड कपमध्ये निर्णायक भूमिका बजावू शकतो.
टीम इंडियाला 2023 या वर्षात रिंकू सिंहच्या रुपााने तोडू आणि आक्रमक असा फिनीशर मिळाला. रिंकूने टीम इंडियासाठी 12 टी 20 सामन्यात 65 च्या सरासरी आणि 180 च्या स्ट्राईक रेटने 262 धावा कुटल्या. रिंकूला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाल्यास तो टीम इंडियासाठी चोखपणे फिनीशरची भूमिका बजावू शकतो.