आयसीसी कसोटी टॉप 10 फलंदाजांची यादी जाहीर, फक्त दोन भारतीय खेळाडूंचा समावेश
आयसीसीने कसोटी फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यात टॉप 10 फलंदाजांच्या यादीत पख्त दोन भारतीय खेळाडूंना स्थान मिळालेलं आहे. विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे.
1 / 6
आयसीसीने कसोटी फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. यात टॉप 10 फलंदाजांमध्ये दोन भारतीय खेळाडूंना स्थान मिळलं आहे. यात भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतचा समावेश आहे. त्याने ऑस्ट्रेलियात संमिश्र कामगिरी केली. त्याच्या त्याला क्रमवारीत फायदा झाला.
2 / 6
ऋषभ पंतने चांगली खेळी केली पण मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. त्याचा फटका काही अंशी टीम इंडियाला बसला. खासकरून चौथ्या कसोटी सामन्यात त्याने नको असलेला फटका मारला आणि टीम इंडियाची लय बिघडून गेली.
3 / 6
पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने 33 चेंडूत 61 धावांची आक्रमक खेळी केली. पहिल्या डावातही त्याने 40 धावा केल्या होत्या. एकीकडे फलंदाज तग धरताना धडपडत होते. तिथे ऋषभ पंतने धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे त्याला टॉप 10 मध्ये स्थान मिळालं आहे. त्याने तीन अंकाची झेप घेतली असून 739 गुणांसह नवव्या स्थानावर पोहोचला आहे.
4 / 6
भारताची यशवी जयस्वाल 847 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. यासह टॉप 10 मध्ये स्थान मिळवणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. ऋषभ पंत आणि जयस्वाल यांच्याशिवाय अन्य कोणत्याही भारतीय खेळाडूला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आलेलं नाही.
5 / 6
विराट कोहली आणि शुबमन गिल यांनाही फटका बसला आहे. विराट कोहलीची नवीन क्रमवारीत घसरण झाली असून तीन स्थानांचं नुकसान होत 27 व्या स्थानावर आहे, तर शुबमन गिलचं तीन स्थानांचं नुकसान झालं असून 23 व्या स्थानावर आहे.
6 / 6
आयसीसीने जाहीर केलेल्या या क्रमवारीतइंग्लंडचा जो रूट 895 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर इंग्लंडचा हॅरी ब्रूक 876 गुणांसह दुसऱ्या स्थानावर, तर न्यूझीलंडचा केन विल्यमसन 867 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.