आयसीसी कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतची मोठी झेप, एका शतकाने असा पडला फरक
भारत बांग्लादेश पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. काही खेळाडूंना फायदा, तर काही खेळाडूंना फटका बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून कमबॅक करणाऱ्या विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे.
1 / 6
आयसीसीने नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना फायदा झाला आहे. तर खराब कामगिरी करणाऱ्यांना खेळाडूंचं नुकसान झालं आहे.
2 / 6
बांगलादेशविरुद्ध कसोटीत पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतला जबरदस्त फायदा झाला आहे. नव्या क्रमवारीत त्याने थेट टॉप 10 मध्ये एन्ट्री मारली आहे. तसेच केएल राहुल आणि विराट कोहली टॉप 10 मधून आऊट झाले आहेत. तर रोहित शर्माचंही काही खरं दिसत नाही.
3 / 6
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने 56 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 10 धावा केल्याने त्याची रेटिंग 751 इतकी आहे. त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. यापूर्वी तो सहाव्या स्थानावर होता.
4 / 6
तब्बल दीड वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या पंतला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आले आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीतल पहिल्या डावात 39 आणि दुसऱ्या डावात 109 धावांची स्फोटक खेळी केली होती. ऋषभ पंत 731 च्या रेटिंगसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
5 / 6
शुबमन गिललाही जबरदस्त फायदा झाला आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात कमबॅक केलं. दुसऱ्या डावात 119 धावा केल्याने थेट 19 व्या स्थानावरून 14 व्या स्थानावर पोहोचला.
6 / 6
दुसरीकडे, रोहित शर्माला पहिल्या कसोटीतील खराब कामगिरीचा फटका बसला आहे. पाचव्या स्थानावरून थेट दहाव्या स्थानी घसरला आहे. दोन्ही डावात मिळून त्याने फक्त 11 धावा केल्या होत्या. विराट कोहलीही टॉप 10 मधून आऊट झाला आहे.