Rishabh Pant : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी ऋषभ पंतबाबत मोठी बातमी, आता टीम इंडियामध्ये…
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय पथकाने मोठी बातमी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
1 / 6
2 / 6
कार अपघातानंतर शस्त्रक्रिया केलेल्या ऋषभ पंतवर आणखी एका शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांनी सुरुवातीला सांगितले होते. मात्र आता अपेक्षेपेक्षा पंतमध्ये सुधारणा झाल्याने तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दुसरी शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.
3 / 6
टाईम्स इंडियाच्या वृत्तानुसार, ऋषभ पंतच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवणाऱ्या वैद्यकीय पथकाला वाटते की पंतला आणखी एका शस्त्रक्रियेची गरज नाही. तसेच, पंतच्या दुखापतीची दर 15 दिवसांनी तपासणी करणाऱ्या टीमने बाकीच्या दुखापती स्वत:च बऱ्या होणार असल्याचे सांगितले आहे.
4 / 6
बीसीसीआयच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, ऋषभ पंतमध्ये सुधारणा अपेक्षेपेक्षा चांगली आहे. त्याचे मनोबल देखील वाढलं आहे. जर तो अशीच प्रगती राहिली तर तो वेळापत्रकाच्या आधी संघात परत येऊ शकतो, असे वृत्त आहे.
5 / 6
दिल्लीतील त्याच्या घरी काही काळ घालवल्यानंतर पंतवर आता एनसीएमध्ये उपचार होत आहेत. इतके दिवस काठीच्या साहाय्याने चालणारा पंत आता त्याशिवाय लांबचे अंतर चालण्यास सक्षम असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
6 / 6
कार अपघातानंतर पंत क्रिकेटपासून दूर आहे आणि या वर्षभर क्रिकेटपासून दूर राहणार आहे. आयपीएलपासून दूर असलेला पंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातूनही बाहेर असेल.