IPL 2024 : आयपीएलमध्ये ही जोडी मैदानात असली की भल्याभल्यांना फुटतो घाम, वाचा आकडेवारी
आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. मागच्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सने जेतेपदावर नाव कोरलं होतं. तर आरसीबी पहिल्या जेतेपदासाठी सज्ज आहे. असं असताना आयपीएल इतिहासात काही जोड्या भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ठरल्या आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत
1 / 6
आयपीएल स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. एकूण 10 संघ या स्पर्धेसाठी सज्ज आहेत. मागच्या 16 पर्वात काही संघाच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे यंदा झोळीत जेतेपद पडावं यासाठी जोरदार प्रयत्न असणार आहे.
2 / 6
आयपीएल 2024 स्पर्धेत पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. 22 मार्चला चेपाक मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यात धोनीचा संघ पहिल्याच सामन्यात सर्वात घातक अशा जोडीचा सामना करणार आहे.
3 / 6
विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस या जोडीने गेल्या वर्षी कहर केला होता. या जोडीने मागच्या पर्वात प्रतिस्पर्धी संघांची कंबरडं मोडलं होतं. या जोडीने मिळून 939 धावा केल्या होत्या. चौकार षटकारांनी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं.
4 / 6
आयपीएलच्या 17 व्या पर्वातही विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस ही जोडी मैदानात उतरणार आहे. मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यंदाही धावांचा डोंगर रचणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
5 / 6
2016 सालच्या आयपीएल पर्वात विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीने विस्फोटक खेळी केली होती. या जोडीने 939 धावा केल्या होत्या. सध्या एबी डिव्हिलियर्स क्रिकेटमधून दूर गेला आहे.
6 / 6
आयपीएलमधील सर्वात विस्फोटक जोडी म्हणून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांचा नावलौकीक आहे. या जोडीने 2021 आयपीएल स्पर्धेत 744 धावा केल्या होत्या. मात्र आता शिखर धवन पंजाब किंग्ससोबत आहे. तर पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघासोबत आहे.