रोहित शर्माने धोनीच्या नको त्या विक्रमाशी केली बरोबरी, कोहली या यादीत अव्वल स्थानी
पहिल्या कसोटी सामन्यानंतर टीम इंडियाने काही धडा घेतलेला दिसत नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 159 धावांवर तंबूत परतला. यात कर्णधार रोहित शर्माला आपलं खातंही खोलता आलं नाही. यासह रोहित शर्मा नको त्या पंगतीत धोनीसोबत बसला आहे.
1 / 6
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना पुण्यात सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासूनच टीम इंडिया पराभवाच्या छायेत असल्याचं दिसत आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 259 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 156 धावांवर बाद झाला.
2 / 6
टीम इंडियाचे सर्वच फलंदाज फेल गेले. त्यात कर्णधारपदाची धुरा खांद्यावर असलेल्या रोहित शर्माला आपलं खातंही खोलता आलं नाही. गेल्या काही सामन्यात रोहित शर्माची अशी निराशाजनक खेळी आहे. एकीकडे संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरला आहे.
3 / 6
पुणे कसोटीत शुन्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्मा सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर बसला आहे. एमएस धोनीसोबत नको त्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे.
4 / 6
रोहित शर्मा आतापर्यंत 143 डावात कर्णधारपद भूषविलं आहे. यात 11 वेळा शून्यावर बाद झाला आहे. तर महेंद्रसिंह धोनी 330 डावात 11 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
5 / 6
विराट कोहलीने 250 डावात कर्णधारपद भूषविलं असून 16 वेळा शून्यावर बाद झाला आहे. तर सौरव गांगुली 217 डावात 13 वेळा, रोहित शर्मा 143 डावात 11 वेळा, धोनी 330 डावात 11 वेळा आणि कपिल देव 115 डावात 10 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
6 / 6
रोहित शर्मा भारतात कसोटी खेळताना दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी 2015 मध्ये अशी स्थिती ओढावली होती. दक्षिण अफ्रिकेनंतर 8 वर्षांनी न्यूझीलंडविरुद्ध अशी स्थिती ओढावली आहे. दरम्यान, टीम साउदीने रोहित शर्माला 14व्यांदा आऊट केलं आहे.