आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. चेन्नईने हा सामना 20 धावांनी जिंकून मुंबईवर मात केली.
रोहित शर्मा याने विजयासाठी मिळालेल्या 207 धावांचा पाठलाग करताना नाबाद शतकी खेळी केली. रोहितने मुंबईकडून चेन्नई विरुद्ध नाबाद 105 धावा केल्या. या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स झाले.
रोहितने शतकी खेळी दरम्यान 5 सिक्स ठोकले. रोहितने यासह खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला. रोहितने 500 सिक्सचा टप्पा पूर्ण केला. रोहित अशी कामगिरी पहिला आशियाई फलंदाज ठरला.
महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या डावातील 4 बॉल बाकी असताना बॅटिंगसाठी आला. धोनीने या 4 बॉलमध्ये माहोल बदलला. धोनीने हार्दिक पंड्या याच्या बॉलिंगवर 4 बॉलमध्ये 6,6,6,2 अशा एकूण नाबाद 20 धावा केल्या. धोनीने 500 च्या स्ट्राईक रेटने 5 हजार धावा पूर्ण केल्या. धोनी चेन्नईसाठी 5 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.
महेंद्रसिंह धोनी याचा हा चेन्नईसाठीचा 250 वा सामना होता. धोनी चेन्नईसाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला.
चेन्नईच्या मथीशा पथीराणा याने मुंबई विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 28 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. मथीशा यासह चेन्नईसाठी 4 विकेट्स घेणारा युवा गोलंदाज ठरला. मथीशा याने वयाच्या 21 वर्ष 118 व्या दिवशी ही कामगिरी केली.