श्रीलंकेविरुद्धची मालिका गमावताच रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, काय झालं ते वाचा
श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात 110 धावांनी पराभूत होताच भारताने मालिका गमावली आहे. ही मालिका गमावताच रोहित शर्माच्यान नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. काय ते जाणून घ्या सविस्तर
1 / 5
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताची नाचक्की झाली असंच म्हणावं लागेल. जिंकणारा पहिला सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात वाईट पद्धतीने पराभूत झाले. दुसऱ्या सामन्यात 240 धावा करताना 32 धावांनी पराभूत झाले. तर तिसऱ्या सामन्यात 248 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 138 धावांवर बाद झाला. यासह 110 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
2 / 5
वनडे मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे. श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय मालिका गमवणारा तिसरा कर्णधार ठरला आहे.
3 / 5
यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अझरुद्दीन कर्णधार असताना नकोसा विक्रम रचला गेला आहे. भारताने 1997 मध्ये शेवटची वनडे मालिका गमावली होती. त्यानंतर 27 वर्षांनी मालिका गमवावी लागली आहे.
4 / 5
मालिका गमावल्यानंतर रोहित शर्माने आपला संताप व्यक्त केला आहे. 'आम्ही मालिका गमवली. सकारात्मक गोष्टीऐवजी काही क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीचा सामना करताना काय करावं लागेल.', असं रोहित शर्मा म्हणाला.
5 / 5
वनडे मालिकेपूर्वी टी20 मालिकेत भारताने श्रीलंकेला व्हाईट वॉश दिला होता. कर्णधार सूर्यकुमारच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली होती. त्याच्या उलट चित्र वनडे मालिकेत पाहायला मिळालं. दिग्गज खेळाडू आणि अनुभवी कर्णधार असूनही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. (फोटो- श्रीलंका क्रिकेट सोशल मीडिया)