रोहित शर्मा वेगाने 15 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज, डेविड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला

| Updated on: Aug 02, 2024 | 8:32 PM

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने काही विक्रम आपल्या नावावर केले. यात कर्णधार म्हणून षटकारांचा रेकॉर्ड आहे. तसेच सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा वेगाने 15 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

1 / 5
कर्णधार रोहित शर्माने आपल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वनडे क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा पल्ला गाठला आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. तसेच वेगाने 15 हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

2 / 5
कर्णधार रोहित शर्माने 47 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी केली. रोहित शर्माने ओपनर फलंदाज म्हणून 15 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने ही कामगिरी 352 व्या डावात केली.

3 / 5
ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नरने ओपनर म्हणून 361 डावात 15 हजार धावांचा पल्ला गाठला होता. आता त्याला मागे टाकत रोहित शर्माने दुसरं स्थान गाठलं आहे. तर डेविड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर गेला आहे.

4 / 5
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने 331 डावात 15 हजार धावा केल्या आहेत. त्यामुळे या स्थानावर सचिन तेंडुलकर कायम आहे. रोहित शर्माने 352 डावात, डेविड वॉर्नरने 361 डावात, विरेंद्र सेहवागने 363 डावात, ग्रीम स्मिथने 368 डावात आणि एलिस्टर कुकने 374 डावात 15 हजारांचा टप्पा गाठला आहे.

5 / 5
रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 120व्यांदा ओपनर म्हणून 50 हून अधिक धावा केल्या आहेत. यावेळी सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरने 120 वेळा ओपनर म्हणून 50हून अधिक धावा केल्या आहेत.