रोहित शर्माने मोडला सौरव गांगुलीचा 20 वर्ष जुना रेकॉर्ड , कोहली-धोनीही ठरलेले अपयशी
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने उपांत्य फेरीचा सामना जिंकून सौरव गांगुलीचा 20 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग 10 विजय मिळवले आहेत. वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. अंतिम फेरीत विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाशी बरोबरी करणार आहे.
1 / 7
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. यासह त्याने चौथ्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली.
2 / 7
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलग दहावा विजय मिळवला आहे. रोहित शर्माने हा सामना जिंकून सौरव गांगुलीचा 20 वर्ष जुना विक्रम मोडला.
3 / 7
टीम इंडियाने 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 10 सामने जिंकले. भारतीय संघ एकही सामना गमावलेला नाही.
4 / 7
20 वर्षांपूर्वी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2003 च्या एकदिवसीय विश्वचषकात 9 सामने जिंकले होते. आता रोहितने गांगुलीचा विक्रम मोडला आहे.
5 / 7
एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच पर्वात सर्वाधिक सामने जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. पाच वेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाने 2003 आणि 2007 च्या विश्वचषकात सलग 11 सामने जिंकले.
6 / 7
या यादीत भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाने या पर्वात 10 सामने जिंकले आहेत. 2003 विश्वचषकात सलग 9 सामने जिंकले आहेत.
7 / 7
ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांनंतर 2007 च्या विश्वचषकात श्रीलंकेने सलग 8 सामने जिंकले, तर न्यूझीलंडने 2015 च्या विश्वचषकातही सलग 8 सामने जिंकले आहेत.