IND vs SL : रोहित शर्मा याच्या शिरपेचात मानाचा तुरा, षटकार ठोकत केली अशी कामगिरी

| Updated on: Sep 12, 2023 | 3:53 PM

Asia Cup 2023, India vs Sri Lanka : आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. या सामन्यात रोहित शर्मा याच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.

1 / 6
आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना सुरु आहे. भारताने हा सामना जिंकल्यास थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. तर श्रीलंका आणि पाकिस्तानसाठी पुढचा सामना करो या मरोची लढाई असेल.

2 / 6
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित शर्मा याने 22 धावा करताच एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

3 / 6
महेंद्रसिंह धोनी याने 320 सामन्यातील 273 सामन्यात 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. रोहित शर्मा याने 248 सामन्यातील 241 डावात ही कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर याने 259 डावात ही कामगिरी केली होती.

4 / 6
टीम इंडियासाठी दहा हजार धावा करणारा सहावा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर (18426), विराट कोहली (13023), सौरव गांगुली (11221), राहुल द्रविड (10768), एमएस धोनी (10599) आणि रोहित शर्मा (10,000)*

5 / 6
आशिया कप स्पर्धेत सर्वाधित षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर झाला आहे. श्रीलंके विरुद्ध एक षटकार मारत 27 षटकार नावावर केले आहेत. आशिया कप वनडे स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या शाहिद आफ्रिदीच्या मागे टाकलं आहे. आफ्रिदीने 21 वनडे सामन्यात एकूण 26 षटकार मारले आहेत.

6 / 6
पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकी खेळून आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. आशिया कप स्पर्धेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही केला आहे. रोहित शर्मा याच्यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता. सचिनने श्रीलंकेविरुद्ध पाच अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध सहा अर्धशतकं झळकावून विक्रम केला आहे.