IND vs ENG : रोहित शर्माने कसोटी मालिकेत मारले इतके षटकार, स्वत:च्याच जुन्या विक्रमाची केली बरोबरी
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला अपेक्षित यश मिळालं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने मांडलेलं गणित काही अंशी सोपं झालं आहे. या मालिकेत रोहित शर्माने अनेक विक्रमांची नोंद केली. असाच एक विक्रम नोंदवला आहे.
1 / 6
रोहित शर्माने धर्मशाळा कसोटीतील पहिल्या डावात शतकी खेळी केली. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 वं शतक ठोकलं. तसेच कसोटी कारकिर्दित 12 शतक होतं. देशांतर्गत खेळलेल्या कसोटी मालिकेतील हे 27 वं शतक होतं.
2 / 6
रोहित शर्माने पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 162 चेंडूचा सामना केला. यात त्याने 103 धावा केल्या. या खेळीत 13 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
3 / 6
कसोटी मालिकेत रोहित शर्माने एकूण 7 षटकार ठोकले. यासह रोहित शर्माने आपल्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दुसऱ्या डावात फलंदाजीची वेळ येणं कठीण आहे. पण एक षटकार मारताच एमएस धोनीच्या पुढे जाईल.
4 / 6
रोहित शर्माने इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 9 डाव खेळले आहेत. रोहित शर्माने 44.44 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत.
5 / 6
रोहित शर्माने 9 डावात 48 चौकार आणि 7 षटकार मारले आहे. 7 षटकारांसह आपल्याच विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 मध्ये झालेल्या कसोटीत 7 षटकार मारले होते.
6 / 6
रोहित शर्मा आणि एमएस धोनी संयुक्तरित्या कसोटीत षटकारांच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहेत. महेंद्रसिंह धोनीने 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका कसोटी मालिकेत 7 षटकार मारले होते.