रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज आणि अनुभवी खेळाडू आहे. रोहितने आपल्या नेतृत्वात मुंबईला तब्बल 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. तसेच रोहितने आतापर्यंत बॅटिंगने अनेक विक्रम केले आहेत. (Photo Credit : PTI)
रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा दुसरा फलंदाज आहे. रोहितने 257 सामन्यांमध्ये 280 षटकार फटकावले आहेत. (Photo Credit : PTI)
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सिक्स ठोकण्याचा विक्रम हा ख्रिस गेल याच्या नावावर आहे. गेलने 142 सामन्यांमध्ये 357 सिक्स लगावले आहेत. रोहित गेलच्या विक्रमापासून फार दूर आहे. (Photo Credit : AFP)
रोहितला ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 77 षटकारांची गरज आहे. तसेच आयपीएलच्या गेल्या हंगामात (IPL 2024) हैदराबादच्या अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 42 सिक्स लगावले होते. (Photo Credit : IPL Photo)
तसेच रोहितने गेल्या हंगामात एकूण 14 सामने खेळले होते. रोहितने या 14 सामन्यांत 417 धावा केल्या होत्या. रोहितने या 14 सामन्यांमध्ये 23 षटकार फटकावले होते. (Photo Credit : PTI)