Cricket Retirement | रोहित शर्मासह हे 5 खेळाडू 2024 मध्ये निवृत्त होऊ शकतात
2024 मध्ये टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप पार पडणार आहे. मात्र या वर्षात काही टॉप खेळाडू हे क्रिकेट विश्वाला रामराम करु शकतात. यामध्ये रोहितसह टीम इंडियाच्या चौघांची नावं आघाडीवर आहेत.
1 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 2024 या वर्षात निवृत्त होणाऱ्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा याचं नाव आघाडीवर आहे. रोहित 34 वर्षांचा आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये रोहित कॅप्टन्सी करु शकतो. त्यानंतर कदाचित रोहित निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो.
2 / 5
मुंबईकर अजिंक्य रहाणे टीम इंडियासाठी फक्त कसोटी क्रिकेट खेळतो. रहाणेने मध्यंतरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 2023 मधून कमबॅक केलं. मात्र आता रहाणेला दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी त्याला डच्चू देण्यात आला.
3 / 5
बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन हा आता खासदार झाला आहे. शाकिबने दुसऱ्या इनिंगची सुरुवात केलीय.आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 नंतर निवृत्ती घेण्याची इच्छा शाकिबची आहे. मात्र राजकारणात सक्रीय झाल्याने तो कधीही क्रिकेटला रामराम करु शकतो.
4 / 5
टीम इंडियाचा ऑलराउंडर आर अश्विन याने आतापर्यंत बॉलिंग आणि बॅटिंगने दुहेरी आणि निर्णायक भूमिका बजावली आहे. मात्र अश्विनला गेल्या काही वर्षांपासून हवी तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे अश्विनही आपला कार्यक्रम आटोपता घेऊ शकतो.
5 / 5
चेतेश्वर पुजारा याने कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडचा वारसा आतापर्यंत सार्थपणे चालवला आहे. मात्र रहाणेप्रमाणे पुजारालाही दक्षिण आफ्रिके विरुद्ध टेस्ट सीरिजमधून डावळण्यात आलं. त्यामुळे पुजारा कधी काय निर्णय घेऊ शकतो हे सांगता येणारं नाही.