Rohit Sharma : रोहित शर्मा आशिया कप स्पर्धेतील सिक्सर किंग, किती षटकार मारले ते जाणून घ्या
Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेत रोहित शर्मा याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पाकिस्तान विरुद्ध 4 षटकार मारताच विक्रमाची नोंद केली आहे. नेमकं काय केलं ते जाणून घ्या..
1 / 6
आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. 49 चेंडूत 4 उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांसह 56 धावा केल्या.
2 / 6
रोहित शर्मा याने या सामन्यात 4 षटकार ठोकताच आशिया चषक वनडे स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
3 / 6
आशिया कप वनडे स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आफ्रिदीने 21 वनडे सामन्यात एकूण 26 षटकार मारले आहेत.
4 / 6
रोहित शर्मा याने 24 वनडे सामन्यात 26 षटकार ठोकले आहेत. यासह रोहित शर्माने आफ्रिदीने आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
5 / 6
पाकिस्तान विरुद्ध अर्धशतकी खेळून आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. आशिया कप स्पर्धेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही केला आहे.
6 / 6
रोहित शर्मा याच्यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता. सचिनने श्रीलंकेविरुद्ध पाच अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध सहा अर्धशतकं झळकावून विक्रम केला आहे.