IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित-विराट रचणार विक्रम, काय ते जाणून घ्या

| Updated on: Aug 03, 2024 | 9:10 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. पहिला सामना बरोबरीत सुटल्याने दुसऱ्या सामन्यात विजयी आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ आतुर आहेत. असं असताना कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्या सामन्यात विक्रम रचण्याच्या वेशीवर आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत

1 / 6
भारत आणि श्रीलंका यांच्यात 4 ऑगस्टला दुसरा सामना कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात विजयी आघाडीसाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. पहिला सामना ड्रॉ झाल्याने उर्वरित दोन्ही सामन्यांची खऱ्या अर्थाने रंगत वाढली आहे. आता मालिका बरोबरीत सुटते की विजय मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

2 / 6
दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या रडारवर काही विक्रम आहेत. महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकरचे विक्रम समोर आहेत. तसेच दुसरा सामना जिंकून टीम इंडिया 100 सामने जिंकण्याचा विक्रम करू शकते.

3 / 6
पहिल्या सामन्यात रोहित शर्माने काही विक्रम आपल्या नावावर केले. आता रोहितच्या रडारवर महेंद्रसिंह धोनीचा विक्रम आहे. धोनीने वनडे सामन्यात 10773 धावा केल्या आहेत. तर रोहितने 10767 धावा केल्या आहेत. त्यामुळे फक्त 7 धावा करताच धोनीला मागे टाकेल.

4 / 6
रोहित शर्मा ख्रिस गेलचा विक्रमही मोडू शकतो. वनडे क्रिकेटमध्ये सिक्सर किंग बनू शकतो. ख्रिस गिलने 301 वनडे सामन्यात 331 षटकार ठोकले आहेत. तर रोहित शर्माने 263 सामन्यात 326 षटकार मारले आहेत. दुसऱ्या सामन्यात 6 षटकार मारताच त्याच्या नावावर हा विक्रम होणार आहे.

5 / 6
विराट कोहलीने  293 वनडे सामन्यात 58 च्या सरासरीने 13872 धावा केल्या आहेत. दुसऱ्या सामन्यात 128 धावा केल्यास 14 हजार धावांचा टप्पा गाठेल. अशी कामगिरी करणारा  दुसरा भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरणार आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांनीच ही कामगिरी केली आहे.

6 / 6
विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 92 धावा दूर आहे. जर असं करण्यात यश मिळालं तर जगातील केवळ चौथा फलंदाज ठरेल. त्याच्याआधी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंगने हा विक्रम केला आहे.